सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची ।
नुरवी पुरवि प्रेम कृपा जयाची ।
सर्वांगी सुंदर ऊटी शेंदुराची ।
कंठी झळके माळ मुक्ताफळाची ॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ति ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥
रत्नखचित फरा तूज गौरीकुमारा ।
चंदनाची ऊटी कुंकुमकेशरा ।
हीरे जडित मुकुट शोभतो बरा ।
रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया ॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ति ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥
लंबोदर पीतांबर फणी वरवंदना ।
सरळ सोंड वक्रतुण्ड त्रिनयना ।
दास रामाचा वाट पाहे सदना ।
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवंदना ।
जय देव जय देव जय मंगलमूर्ति ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥
नुरवी पुरवि प्रेम कृपा जयाची ।
सर्वांगी सुंदर ऊटी शेंदुराची ।
कंठी झळके माळ मुक्ताफळाची ॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ति ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥
रत्नखचित फरा तूज गौरीकुमारा ।
चंदनाची ऊटी कुंकुमकेशरा ।
हीरे जडित मुकुट शोभतो बरा ।
रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया ॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ति ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥
लंबोदर पीतांबर फणी वरवंदना ।
सरळ सोंड वक्रतुण्ड त्रिनयना ।
दास रामाचा वाट पाहे सदना ।
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवंदना ।
जय देव जय देव जय मंगलमूर्ति ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥